अभिनेत्री व जनहित न्युज महाराष्ट्र ची प्रतिनिधी सूत्रसंचालिका सुवर्णा देसाई यांचा सत्कार

अभिनेत्री व जनहित न्युज महाराष्ट्र ची प्रतिनिधी सूत्रसंचालिका सुवर्णा देसाई यांचा सत्कार 
उल्हासनगर : 10 एप्रिल 2023
जनहित न्युज महाराष्ट्र प्रस्तुत हरी आल्हाट निर्मित दिग्दर्शित मराठी लघुपट घरटं ह्या लघुपटात  माझ्या सुनबाई ची भुमिका करणार्या सौ. सुवर्णा देसाई यांचा सत्कार समारंभ आज निर्माते दिग्दर्शक ,हरि चंदर आल्हाट यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. सुवर्णा हिने सुनबाई ची भुमिका इतकी उत्कृष्ट साकारली होती की ती भूमिका तिच्यासाठी Mile Stone ठरली व तिला अनेक नाटकं, शॉर्ट फिल्म व टिव्ही मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. क्राईम पेट्रोल, नवे लक्ष्य मधील तीची पोलिसांची भूमिका असो की अबोली मधील महिला मंडळ कार्यकर्तीची भुमिका असो तिने प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. सद्या कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या अतिशय गाजलेल्या बाळू मामांच्या मालिकेतून ती महाराष्ट्रातील घरा घरात पोहोचली आहे व  तिने साकारलेल्या भूमिकेचं समाजातील सर्व स्तरांतून कौतुक केलं जात आहे. अशा गुणी कलाकार व कसलेल्या अभिनेत्रीच्या सत्कार समारंभाला  उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले व एका राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या अतिशय गाजलेल्या बाळू मामांच्या मालिकेतून घराघरांत आवडीने बघण्यात येणार्या मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा माझ्या हस्ते सत्कार करण्याचा मान दिल्या बद्दल निर्माते दिग्दर्शक व संपादक हरी आल्हाट यांचे आभार महाराष्ट्र तेज न्यूज चे संपादक तसेच जे के सी मानवाधिकार अँटी करप्शन ब्युरो व घरट मराठी लघुपटाचे अभिनेते श्याम भाऊ जांबोलीकर यांनी व्यक्त केले 
या कार्यक्रमाला उपस्थित, भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे, मनीलाल डांगे, सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे राजकुमार शर्मा, जनहित न्यूज महाराष्ट्र व बातमी जनहितचे कायदेशीर सल्लागार एडवोकेट किरण जाधव, समाजसेविका अलका जगताप,
सृष्टी सीमा संतोष उबाळे फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष उबाळे, तसेच अभिनेत्री सूत्रसंचालिका, राजश्री काळे, संगीता भारस्कर, संगीता साळवे, साप्ताहिक बातमी जनहित व जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या उपसंपादिका, ज्योती पवार, सुमन शेंडगे, शरद घूडे, आबासाहेब साठे, बाबा आढाव, वरिष्ठ पत्रकार अशोक शिरसाट, विलास काकडे, सोनाली शेंडगे, तसेच अनेक मान्यवर पत्रकार व समाजसेवक उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता प्रदीप हरी आल्हाट, सौ मिरा प्रदीप आल्हाट मेहनत घेतली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार