दीव्यांग आधार सेवा संस्थांचे वतीने परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
दीव्यांग आधार सेवा संस्थांचे वतीने परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
उल्हासनगर : ( आबासाहेब साठे)
दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी महामानव बोधिसत्व भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती दिव्यांग आधार सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मध्यवर्ती कार्यालय उल्हासनगर येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सचिन राम सावंत यांच्या नेतृत्वामध्ये संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधानामधील त्यांच्या कार्याचे मूल्यांकन व योगदान या विषयावरती 10 ते 72 वर्षे वयोगटातील विद्यार्थी मुले व मुली यांची निबंध स्पर्धा तसेच वकृत्व स्पर्धा, संगीत खुर्ची महिलांकरिता, फुगे फुगविणे, दिव्यांग बांधवांकरिता सुद्धा काही स्पर्धा आयोजित केल्या गेल्या, दिव्यांग आधार सेवा संस्थेमधील दिव्यांग बांधवांना मिळालेल्या स्वयंचलित ट्राय सायकल यांच्या माध्यमातून सुभाष टेकडी, उल्हासनगर 4 येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्याकरिता संस्थेच्या कार्यालयापासून ते आंबेडकर चौक अशी रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅली किमान 5 किलोमीटर आयोजित करून संस्थेच्या कार्यालयावरती त्याची सांगता करण्यात आली.
यावेळी मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधवांनी व त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थित राहिले. कार्यक्रमाची सुरुवात बुद्ध वंदना घेऊन केली नंतर आयोजित कार्यक्रमात असलेले सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये निबंध लेखन, संगीत खुर्ची, फुगे फुगविणे व मेणबत्ती पेटविणे या प्रकारचे सांस्कृतिक खेळ घेण्यात आले. या स्पर्धांमध्ये विजेत्या खेळाडूंना प्रथम द्वितीय व तृतीय अशा प्रकारचे पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी सोहम फाउंडेशनचे अध्यक्ष/संस्थापक श्री. राजेंद्र देठे साहेब तसेच जनसंपर्क अधिकारी, श्री. नारायण वाघ साहेब यांनी उपस्थित राहून दिव्यांगांना विविध योजनांचे मार्गदर्शन केले व सदैव दिव्यांगांसोबत तसेच संस्थेसोबत राहून दिव्यांगांना विविध योजना पाठपुरावा करून देण्यात मदत करतील, असे आश्वासन दिल.
निबंध लेखनामधील प्रथम पारितोषिकचे वितरण सौ. वैशालीताई कांबळे, समाजसेविका यांच्या माध्यमातून वितरित करण्यात आले व उर्वरित स्पर्धेतील विजेत्यांना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पारितोषिक वितरित करण्यात आले. उपस्थित दिव्यांग बांधवांकरिता श्री. राजू गौतम समाजसेवक यांनी आहाराची सोय करून तसेच इतर सामाजिक मान्यवर कार्यकर्त्यांनी इतर प्रकारे संस्थेच्या कार्यास हातभार लावून आप आपल्या परीने योगदान दिले. दिव्यांग लाभार्थ्यांना मिळालेल्या इलेक्ट्रिक ट्राय सायकलच्या माध्यमातून रॅली काढून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम सुव्यवस्थित होण्याकरिता संस्थेचे पदाधिकारी संस्थेचे छाया सावंत, सचिव अर्चना चव्हाण, खजिनदार बी. आर. पाटील प्रवक्ते, जितेंद्र गायकवाड, जनसंपर्क अधिकारी मनोहर राजाने, उल्हासनगर 1, 2 व 3 चे ब्लॉग अध्यक्ष, चंद्रभान बागुल, उल्हासनगर 4 व 5 चे ब्लॉक अध्यक्ष, ऋशी राजानी, सहाय्यक यांचे मौलाचे योगदान लाभले व कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद