मानवता अभियान सामाजिक संस्थेच्या वतीने सम्राट अशोक यांची जयंती साजरी
उल्हासनगर मध्ये मानवता अभियान सामाजिक संस्थेच्या जनसंपर्क कार्यालयात २९ मार्च २०२३ रोजी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले
या कार्याक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एडवोकेट किरण जाधव ,आर. पी. आय. युवा नेते संतोष उबाळे, कवी अनिल भालेराव,बहुजन समाज पार्टी शहर अध्यक्षा निवेदिता जाधव, विकास जाधव, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते
मानवता अभियान सामाजिक बहुउद्देशीय या संस्थेच्यावतीने सम्राट अशोक याची २३२७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच या जयंती प्रसंगी संस्थेचे खजिनदार प्रकुल्लता मोहोड, सूमिता शेजव, शालिनी शेजूळ, तारा तायडे, पुष्पा शेगोकार, इंगोले ,नैना मनवर, शीला . उज्वला उबाळे, रनाशीवरे, भीमराव उबाळे, आतिश जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद