महाराष्ट्र दिनी 'रेडिओ मिरची'सोबत मराठी कलाकारांचा मराठी राज्यगीत 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा'चा नवा व्हिडीओ प्रदर्शित


महाराष्ट्र दिनी 'रेडिओ मिरची'सोबत मराठी कलाकारांचा मराठी राज्यगीत 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा'चा नवा व्हिडीओ प्रदर्शित
मुंबई : १ मे, महाराष्ट्र दिनाच्या दिवशी रेडिओ मिरची सादर करत आहे, मराठी मनामनातलं राज्यगीत एका नव्यारूपात, नव्या व्हिडीओ द्वारे. या व्हिडिओ मध्ये प्रख्यात अभिनेत्री विभावरी देशपांडे, स्मिता गोंदकर, सेलिब्रिटी शेफ मधुरा बाचल आणि लोकप्रिय अभिनेता संतोष जुवेकर, आरोह वेलणकर यांच्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील मिरची Rjs जसे कि, RJ निधी, RJ राहुल, RJ गौती, RJ सौरभ, RJ भूषण, RJ निमी सुद्धा दिसणार आहेत.

हा व्हिडीओ १ मे रोजी मिरची च्या 'mirchimarathi' या youtube चॅनेलवर प्रदर्शित झाला आहे. या गाण्याचं पुनर्निर्माण 'मिरची' ने केलं असून, संगीत यश पहाडे यांनी दिलं आहे आणि RJ निधी, कौस्तुभ नाईक आणि यश पहाडे यांनी गायलं आहे. या सर्वांना, मिरचीच्या कंटेंट हेड स्मिता रणदिवे आणि मिर्ची लव चे प्रोग्रामिंग हेड मंदार कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. 

हा व्हिडीओ Natives Communication ने तयार केलाय. 
 या राज्यगीताचे मूळ गायक शाहीर साबळे हे आहेत. राजा बढे यांचे शब्द आणि श्रीनिवास खळे यांनी ते संगीतबद्ध केलेलं आहे. या दिग्गजांना मिरचीने त्रिवार मुजरा करत आदरांजली वाहिली असून नव्या ढंगातील 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा'चा हा व्हिडीओ रसिकांनी नक्की  पहावा_राम कोंडीलकर मुंबईबातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधावा 9960504729
__________________________________________
साप्ताहिक बातमी जनहित या वृत्तपत्राची सभासद नोंदणी सुरू आहे वार्षिक रुपये २५१/ दोन वार्षिक ५०१/ रुपये. पंचवार्षिक रुपये१००१/ तसेच आजीवन रुपये ५५०१ सभासद देणगी मिळाल्यास सभासदांचे वाढदिवस ज्या दिवशी असेल त्या दिवशी वृत्तपत्रात त्यांचे वाढदिवस शुभेच्छा प्रकाशित केले जाईल तसेच प्रत्येक अंक वाचण्यासाठी कार्यालयात किंवा दिलेल्या पत्त्यावर पोच होईल _________________________________________आपण दिलेल्या सभासद देणगी बद्दल सर्वांचे आभार____________________
१) राजकुमार शर्मा
२) भिमराव चीलगावकर
३) भारत राजवानी
४) जगदीश पटेल
५) प्रदीप गोडसे
६) सुभाष साळुंके
__________________________________________आपण ही सभासद देणगी देवून आमच्या जनहित कार्याला सहकार्य करावे हि विनंती
संपादक हरी आल्हाट ९९६०५०४७२९


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप