दिव्यांग कल्याणकारी योजना व समग्र शिक्षा यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांगांसाठी डी टी पी व तांत्रिक प्रशिक्षण शिबिर
दिव्यांग कल्याणकारी योजना व समग्र शिक्षा यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांगांसाठी डी टी पी व तांत्रिक प्रशिक्षण शिबिर
उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक आजिज शेख व अतिरिक्त आयुक्त शहर जमीर लेगरेकर, यांच्या आदेशाने उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग कल्याणकारी योजना व समग्र शिक्षा यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांगांसाठी डी टी पी व तांत्रिक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सदर प्रशिक्षण उद्घाटन सोहळा मध्ये उपायुक्त डॉ सुभाष जाधव, उपायुक्त मुख्यालय अशोक नाईकवाडे ,उपायुक्त कर विभागच्या सौ. प्रियंका राजपूत , क्रीडा अधिकारी शांताराम चौधरी, दिव्यांग कल्याण विभाग प्रमुख राजेश घनगाव , तसेच अपंग युनियन अध्यक्षव अपंग विकास महासंघचे राजेश साळवे, व सौ प्रांजली अरुण मोरे, व भारतीय रेल्वेचे श्रीकृष्ण दासरी, कार्यकर्ते इकबाल शेख, डॉ हर्षल पवार, डॉ अंजली पवार, व समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत मनपा समन्वयक सौ संगीता लहाने व त्यांचे सहकारी अमोल साबळे ,योगिता होलगिर ,राजश्री पाटील, हर्षदा नक्षीवाले उपस्थित होते. सदर उद्घाटन सोहळ्यामध्ये दिव्यांगांसाठी डीटीपी व तांत्रिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सदरचे प्रशिक्षण 18 ते 30 वयोगटातील दिव्यांगांकरिता प्रशिक्षण फ्री मध्ये मोफत देण्यात येणार आहे. तसेच ज्या विधवा महिला आहे त्यांच्यासाठी सुद्धा प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येईल व निराधार बालकास संपूर्ण ट्रेनिंग प्रशिक्षण मोफत देण्यात येईल असे आव्हान ईशान कम्प्युटर ट्रेनिंग सेंटरचे अरुण मोरे यांनी केले आहे. अशी माहिती
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद