उल्हास नदी प्रदूषणमुक्ती,व बचावासाठी महाराष्ट्रदिनी कल्याण तालुका ग्रामीणच्या वतीने रायते नदीपुलावर जनजागृती अभियान
उल्हास नदी प्रदूषणमुक्ती,व बचावासाठी महाराष्ट्रदिनी कल्याण तालुका ग्रामीणच्या वतीने रायते नदीपुलावर जनजागृती अभियान
कल्याण; उल्हास नदी प्रदूषणमुक्ती,व बचावासाठी महाराष्ट्रदिनी कल्याण तालुका ग्रामीणच्या वतीने रायते नदीपुलावर जनजागृती अभियान राबवण्यात आले,यात नदी पात्रात होणारे प्रदूषण,शहरी व ग्रामीण भागातून वाहत येणारी गटारे, कारखान्यातील केमिकल युक्त पाणी, निर्माल्य, हार फुले, टाकाऊ पदार्थ यामुळे नदी मोठया प्रमाणात दूषित होते, यावर उपाययोजना करावी ही मागणी तालुक्याच्या वतीने जोर धरू लागली आहे यावेळी जिल्हापरिषदेच्या माजी,सदस्या, तालुक्यातुन अनेक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनाचे कार्यकर्ते,तालुक्यातील नागरिक,महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी कल्याण तालुक्याच्या वतीने संयोजक राम सुरोशी यांनी सर्वांचे आभार मानले, यासमयी मुरबाड तालुका अध्यक्ष चेतनसिंग पवार, मधुकरजी वाळिंबे, ऍड अविशजी जुवारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अशी माहिती शशिकांत दायमा यांनी दिली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद