हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्घृण हत्या करणारे आरोपी जेरबंद

हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्घृण हत्या करणारे आरोपी जेरबंद उल्हासनगर :  दिनांक २६/०५/ २०२३ रोजी जय जनता कॉलनी सेक्शन ३९ मेट्रोबारचे मागे उल्हासनगर कॅम्प नंबर ५ येथील राहणारा शब्बीर सलीम शेख याचा रात्री ११ वाजून ५० मिनिटाच्या सुमारास विक्रम कवठणकर, दिनेश कवठणकर, जयेश साळुंखे, विजय रुपानी व त्यांचे इतर साथीदारांनी विक्रम कवठणकर यांचे सोबत झालेल्या मागील वादाचा व यापूर्वी उसने पैसे न दिल्याचा राग मनात धरून फिर्यादी यांचा भाऊ शब्बीर सलीम शेख व ४५ वर्षे, यास चाकू, सुरा, धारदार , शस्त्राने वार करून जीवे ठार मारून फिर्यादी याच्यावर धारदार शास्त्रानिशी हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्यादी नामे फिरोज सलीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादी वरून हिल लाइन पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि, नं १९३/२०२३, भा द वि, कलम ३०२,३०७,१४३,१४५,१४७,१४८,१४९, सह महा पो.का. क.३७( १),१३५ प्रमाणे दिनांक २७/०५/२०२३ रोजी दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याच्या पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत डेरे हे करत आहेत, सदर गुन्ह्यातील आरोपीत यांनी मयत याची निर्घृण हत्या करून आरोपी पळून गेले होते 
त्यांचे ठाव ठिकाण बाबत काहीएक माहिती मिळून येत नव्हती सदर आरोपींचा शोध घेणे करिता मा.डॉ .सुधाकर पठारे पोलीस उपायुक्त परिमंडळ_ ४ व मा.सहाय्यक पोलीस आयुक्त उल्हासनगर विभाग मोतीचंद राठोड यांचे मार्गदर्शन व आदेशानुसार वेगवेगळे पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकामी रवाना करण्यात आले त्याप्रमाणे मालमत्ता शोध कक्ष गुन्हे शाखा ठाणे यांनी गुन्ह्यातील पाहिजे आरोपी दिनेश राजेंद्र कवठणकर वय वर्ष २३ राहणार वीर तानाजी नगर उल्हासनगर कॅम्प नंबर ५ यास ठाणे येथून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर केल्याने त्यास दिनांक २७/०५/२०२३  रोजी अटक करण्यात आले आहे तसेच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक राजपूत व त्यांचा स्टाफ या पथकास सदर गुन्ह्यातील आरोपी हे संभाजी चौक उल्हासनगर कॅम्प नंबर ४ येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यांनी सदर ठिकाणी सापळा रचून सदरचा गुन्हा करणारे ,१) विक्रम उर्फ विकी राजेंद्र कवठणकर वय वर्ष २६  राहणार वीर तानाजी नगर गजेंद्र कॉलनी सेक्शन ३९ उल्हासनगर कॅम्प नंबर ५.      
 २) प्रशांत उर्फ सलाड, सुरेश तायडे, वय वर्षे २४ राहणार पाटील चाळ रूम नंबर ११ जानकी विद्यालयाच्या बाजूला पाटील नगर मांडा टिटवाळा ३) संत कबीर दादाजी बोराळे वय वर्ष २३ राहणार बुद्ध विहाराच्या समोर राऊत यांची खोली राहुल नगर संभाजी चौक उल्हासनगर कॅम्प नंबर ४ यांना ताब्यात घेतले आहे सदर आरोपीकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी मयत शब्बीर सलीम शेख याचे सोबत उसने पैसे देण्याचे पूर्वीच्या झालेल्या वादातून सदरचा गुन्हा केल्याचे कबुली दिली असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांचे विरुद्ध यापूर्वी हिल लाईन व विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत गुन्ह्यातील अटक आरोपीत यांचेकडे अधिक तपास करून त्यांचे इतर साथीदारांचा शोध घेत आहोत अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी राठोड यांनी पत्रकारांना दिली 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार