उल्हासनगर काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाची शहरातील प्रश्नांसंदर्भात उल्हासनगर महानगर पालिका आयुक्तांची घेतली भेट
उल्हासनगर काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाची शहरातील प्रश्नांसंदर्भात आयुक्तांची भेट
प्रतिनिधी आबासाहेब वाघमारे
उल्हासनगर दिनांक ११ नोव्हेंबर रोजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजीज शेख यांची भेट घेतली
सदर भेटीत शहरातील खालील विषयांवर कार्यवाही करण्याची मागणी या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली
शिष्टमंडळाच्या प्रमुख मागण्या खालील प्रमाणे
१) डम्पिंग ग्राउंड उल्हासनगर - ५ येथील रोड समस्या.
२) कैलास कॉलनी वाया कुर्ला कॅम्प ते भाटिया चौक येथील रस्त्याचे काम.
३) छत्रपती शाहू महाराज उड्डाणपूल उल्हासनगर-३ येथे स्ट्रक्चर ऑडिट करणे.
४) प्रभाग क्रमांक १८ येथे आरोग्य केंद्र सुरू करणे व शून्य कचरामुक्त करणे.
५) रामकिशन करोतिया नगर सी ब्लॉक उल्हासनगर - ३ येथील दूषित पाण्याची समस्या.
उल्हासनगर महानगर पालिका आयुक्तांनी सदर मागण्यांची योग्य ती दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या दालनात बोलावून या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले
यावेळेस अनेक पदाधिकारी उपस्थित
संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद