उल्हासनगर तालुका शाखेतर्फे ७३ वा भारतीय संविधान गौरव दिन साजरा

उल्हासनगर तालुका शाखेतर्फे ७३ वा भारतीय संविधान गौरव दिन साजरा  

उल्हासनगर (अशोक शिरसाट ) 
भारतीय राज्य घटना   दि. २६ नोव्हेंबर १९४९ ला घटना समितीचे अध्यक्ष डाॕ राजेंद्र प्रसाद  यांना भारतीय घटनेचे शिल्पकार डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांनी   सुपूर्द केली हि भारतीय राज्य  घटना  दि. २६ जानेवारी १९५० रोजी या देशात अंमलात आली तेव्हापासून देशात प्रजासत्ताक राज्य सुरु झाले 
तसेच भारतीय बौध्द महासभा उल्हासनगर तालुका शाखा आणि विभागीय शाखेच्या संयुक्त विद्यमाने  ७३ वा  भारतीय संविधान गौरव दिना निमित्त धम्म रॕलीचे आयोजन करण्यात आले होते तसेच  प्रथम सकाळी  १० वा  बुध्द वंदना आणि भारतीय संविधानाचे वाचन करुन सुभाषनगर , पंचशील बुध्द विहार , येथून धम्म रॕलीची सुरुवात करण्यात आली होती
 सदर रॕलीचा मार्ग  सुभाष नगर , फाॕरवर लाईन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, १७ सेक्शन चौक , ते उल्हासनगर महापालिका - डाॕ बाबासाहेब आंबेडकर नगर , चोपडा कोर्ट येथे सुध्दा भारतीय घटनेचे शिल्पकार डाॕ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करुन समता सैनिक दल यांच्यावतीने मान वंदना देण्यात आली 
 रॕली प्रसंगी , उल्हासनगर तालुका अध्यक्ष  अशोक व्हि जाधव , सरचिटणीस रोशन पगारे, कोषाध्यक्ष जीवन मोरे, उपाध्यक्ष - अशोक एफ शिरसाट , प्रल्हाद  पंडित , विजय कांबळे  प्रमिलाताई थोरात, सचिव शामभाऊदास भिंगारदिवे, सुशिलाताई  सोनवणे, कुसुमताई पंडित , प्रकाश कांबळे , आॕडीटर  छगन सुरवाडे  संघटक - संदीप उबाळे, ईश्वर सोनवणे,कल्पनाताई वानखेडे, संघमित्राताई साळुंके, छायाताई म्हस्के,  पांडू वाघमारे, देविदास कांबळे , किशोर निकम,  मारुती तायडे, त्रिभवन जैसवार, पद्माताई निकम वसंत साबळे, माजी अध्यक्ष वसंत जाधव ,    वंचित बहुजन आघाडीच्या  उल्हासनगर शहर महिला अध्यक्षा रेखाताई उबाळे,  यांच्यासह समता सैनिक दल , यावेळी उपस्थित होते
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 
       संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार