उल्हासनगर मध्ये जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धा संपन्न ,

उल्हासनगर मध्ये जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धा संपन्न , 
उल्हासनगर - ठाणे जिल्हा सब ज्युनिअर - १४ वर्षाखालील मुलं व मुली रग्बी जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी स्पर्धा 20 नोव्हेंबर २०२२ रोजी बी. के बिर्ला महाविद्यालय कल्याण व ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशन च्या संयुक्तविद्यमाने ठाणे जिल्हा सब ज्युनिअर अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन सेंच्युरी  स्पोर्टस ग्राऊंड येथे करण्यात आले होते. मुलांच्या गटात सेंच्युरी रेयॉन हायस्कूल,शहाड विजेता,सेंट अँथनी हायस्कूल ,बदलापूर उपविजेता व होली फेथ हायस्कूल, कल्याण  तृतीय ठरला.

मुलींच्या गटात जे.सी.एस.मराठी विद्यालय भाल विजयी,सेंट अंथॉनी हायस्कूल, बदलापूर  उपविजयी,गुरुकुल इंटरनॅशनल हायस्कूल ,बदलापूर तृतीय क्रमांक पटकावला.
ह्यास्पर्धेतुन ठाणे जिल्ह्याचा १४वर्षाखालील मुला ,मुलींचा  २० जणांचा संभाव्य संघ निवडण्यात आला. ह्या निवड करण्यात आलेल्या खेळाडूंचे सराव शिबिर दिनांक २१ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२२ ह्या कालावधीत सेंच्युरी रेयॉन हायस्कूल येथे आयोजित करण्यात आले आहे. नेरळ,जिल्हा-रायगड येथे होणाऱ्या सब ज्युनिअर राज्य अजिंक्यपद रग्बी स्पर्धेत सहभागी होणार आहे. 
स्पर्धेचे उद्घाटन बी.के.बिर्ला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. के.डी बराटे व डॉ. क्षीरसागर  ह्यांच्या हस्ते करण्यात आले.स्पर्धेचा बक्षीस समारंभ जे.सी.एस हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री.गणेश कोळेकर सर व बी.के.बिर्ला महाविद्यालय कल्याण चे प्रा. यज्ञेश्वर बागराव सर ह्याच्या हस्ते करण्यात आला, स्पर्धा प्रमुख म्हणून  सुभाष कोंढारी सर ह्यांनी काम पाहिले. ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशनचे सचिव प्रमोद पारसी सर ह्यांनी सर्व मान्यवर व खेळाडू ह्यांचे आभार मानले. अशी माहिती मितेश जैन यांनी दिली
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा
 संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप