ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा प्रचार सुरू शिक्षकांचा आमदार शिक्षकच पाहिजे सर्व शिक्षकांनी केला निर्धार

ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा प्रचार सुरू  शिक्षकांचा आमदार शिक्षकच पाहिजे सर्व शिक्षकांनी केला निर्धार.     
     उल्हासनगर शहरामध्ये महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचा जोरदार प्रचार दौरा झाला,सर्व शाळांनी म्हात्रे सरांचे स्वागत  केले, 
उदंड प्रतिसाद देत शिक्षकांचा आमदार शिक्षकच झाला पाहिजे आमच्या मनातील आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर हेच आहेत,
मागच्या निवडणुकीत निवडून आलेल्या   विद्यमान आमदाराचे तोंड सुद्धा आम्ही पाहिलेलं नाही. ते शिक्षक नसल्याने त्यांना शिक्षकांच्या व्यथा माहित नाहीत, यापुढे शिक्षक नसलेला उमेदवारला आमच्या शाळेत प्रचार करायला आल्यास त्यांना त्यांची जागा दाखवू अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या शिक्षकांना विकत घेण्याची" भाषा करणाऱ्या शिक्षक नसलेला उमेदवारला महागात पडेल 
यावेळी 50 हजाराचे पाकीट दिले तरी शिक्षक कोणत्याच आमिषाला बळी पडणार नाहीत.आमच्यासाठी काम करणारे एकच माणूस!  तो म्हणजे ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी हजारो  शिक्षक -शिक्षकेत रांची कामे केलेली आहेत,अशा माणसाला शिक्षकांच्या भल्यासाठी,शाळा वाचल्या पाहिजेत,शिक्षक वाचले पाहिजेत आणि आपलं अस्तित्व टिकवलं पाहिजे म्हणून निवडून दिले पाहिजे असा निश्चय अनेक शिक्षकांनी व्यक्त केला प्रचारासाठी शिक्षक क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष गवळी सर, मुख्याध्यापक संघटनेच्या साळुंखे मॅडम ,जाधव मॅडम ,मुख्याध्यापक संघाचे सहसचिव प्रवीण लोंढे सर  जूनियर कॉलेज शिक्षक सेनेचे उपाध्यक्ष दीपक पाटील सर उल्हासनगरचे उपाध्यक्ष भामरे सर व सहसचिव समाधान कुवर सर उपस्थित होते अशी माहिती संजय भामरे सर यांनी दिली
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 
संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप