वऱ्हाड वाजंत्री " चित्रपटाचा माटुंग्याच्या सिटीलाईट सिनेमागृहात प्रीमियर शो संपन्न
मुंबई : स्वराज फिल्म प्रॉडक्शन कॅप्टन कल्पेश मगर व सह निर्माता अतुल ओहोळ आणि दिग्दर्शक विजय पाटकर यांचा आज ११ नोव्हेंबर २०२२ रोजी " वऱ्हाड वाजंत्री " चित्रपटाचा माटुंग्याच्या सिटीलाईट सिनेमागृहात प्रीमियर शो संपन्न झाला म्हणजे अप्रतिम असा लग्नसोहळा आज घडला , या सोहळ्याला अनेक मान्यवर वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते, या चित्रपटातील सर्वच अतरंगी कलाकार यानी मस्त कामे केलीत, अप्रतिम दिग्दर्शन विजय पाटकर यांचे लाभले आहे, त्यांनी या चित्रपटात 21 कलाकार घेऊन जो काय धुमाकूळ घातला आहे त्याला तोड नाही, कोरोना काळानंतर प्रथमच जबरदस्त हा विनोदी चित्रपट आपल्या सगळ्याना हसवल्याशिवाय राहणार नाही..!
यात भली मोठी कलाकार यांची वऱ्हाडी टीम आहे - मोहन जोशी, कै.रीमा लागू ,पंढरीनाथ कांबळे, हेमांगी कवी ,प्रिया बेर्डे,जयवंत वाडकर,विजय कदम, पूर्णिमा अहिरे,आनंदा कारेकर,शीतल कल्हापुरे, साक्षी परांजपे,राजेश परांजपे,जयवंत भालेकर,प्रभाकर मोरे, श्री शिवाजी रेडकर,विनीत बुंडे ,गणेश रेवडेकर,सुनील गोडबोले,दिपक जोशी आणि धुमशान घालणारे अनेक कलाकार...! Pro - राम कोंडीलकर
११ नोव्हेंबर २०२२ पासून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात,जवळच्या सिनेमागृहात जाऊन नक्की पहा आणि आपल्या मराठी चित्रपटाला आणि निर्माता व कलाकार, टेक्निशियन यांना मोठे कराप्रतिनिधी गणेश तळेकर जनहित न्युज महाराष्ट्र मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद