शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे आदिवासी पाड्यात मिठाई व फटाके वाटप

शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे  आदिवासी पाड्यात मिठाई व फटाके वाटप
 
 अंबरनाथ: बातमीदार चंद्रकांत कणसे
शिवस्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे दिवाळीनिमित्त रविवार दिनांक 23 ऑक्टोंबर रोजी अंबरनाथ पश्चिमेकडील गावदेवी मंडळ चिखलोली आदिवासी गावात मिठाई वाटपाचा कार्यक्रम पार पडला
 या कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष  चंद्रकांत कणसे, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष सौ रेशमा कणसे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष हर्षदा सावंत, महाराष्ट्र राज्य युवती अध्यक्ष नीलम कणसे  महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष वेदांत कणसे, अंबरनाथ शहर उपाध्यक्ष  भरत धुरी ,अंबरनाथ शहर युवा  अध्यक्ष ओमकार मोरे, युवा उपाध्यक्ष प्रथमेश गुरुखेल, मीडिया अध्यक्ष सिद्धेश मोरे, व इतर सर्व शिवसेवक शिवसेविका उपस्थित होते विशेष अतिथी श्रीमती शुभांगी राणे व हर्षदा सावंत यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली,
 त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 25 आदिवासी कुटुंबीयांना मिठाईवाटप , कपडे वाटप व लहान मुलांना फटाके वाटप करण्यात आले, संपूर्ण कार्यक्रम करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस गणेश जाधव  हर्षदा सावंत, छायाताई निकम  भानुषाली मॅडम  रवी शर्मा, मराठे मॅडम यांनी रोख रकमेच्या स्वरूपात मदत केली. तसेच भारती पाटील, रवींद्र निर्भवणे  वर्षा पालांडे, भारती तळेकर, यश सावंत यांनी कपडे स्वरूपात मदत केली. तसेच आदिवासी बंधू भगिनींपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी  एकनाथ बारघेवडे, राजू मुकणे  मनोहर पाटील, सोनू मुकणे, राजा मुकणे ,प्रकाश वाघे, लक्ष्मण फसाळे  प्रकाश शेज, बाळू वाघे, यांनी मोलाचे सहकार्य केले.
न्युज चैनेल व पेपर मध्ये बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 
संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप