राज्य प्रशासकीय व्यवसाय संस्था मुंबई,SIAC येथे मा.संचालक श्री. खुसपत जैन यांची घेतली भेट
राज्य प्रशासकीय व्यवसाय संस्था मुंबई,SIAC येथे मा.संचालक श्री. खुसपत जैन यांची घेतली भेट
आपल्या वॉर्ड क्र.44 मध्ये गावदेवी मैदान लगतचे आरक्षण क्र.121 येथे
मा.मुख्यमंत्री ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब मार्गदर्शनाखाली
खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे साहेब व आमदार डॉ.बालाजी किणीकर साहेब यांच्या सहकार्याने माझ्या अथक प्रयत्नांनी शासकीय निधीतून न.पा.च्या माध्यमातून उभे केलेल्या #अद्यावत_शैक्षणिक_सोयीसुविधा_इमारत येथील MPSC UPSC भवन मध्ये स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र शासनाच्या SIAC संस्थेचे वतीने सूरू करण्यात यावे, यामुळे विद्यार्थ्यांना अनाठायी खर्च/फी आकारली जाणारी नसून CET द्वारे विद्यार्थ्यांची निवड होऊन IAS,IPS,IRS,IFLS व तत्सम पदे इ.करिता SIAC द्वारे यावर्षी पासून प्रशिक्षण केंद्र सुरू व्हावे,याकरिता खासदार डॉ. श्रीकांत जी शिंदे यांच्या सूचनेनुसार अंनप मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या समवेत प्रयत्न सुरू आहेत.
उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव श्री. रस्तोगी साहेब, यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून SIAC चे पुणे मुख्य संचालक डॉ. मानेसाहेब व अधिक्षक श्रीमती दिक्षित मॅडम यांच्या कडे अभिप्राय त्वरीत प्राप्त होण्यासाठी फोन द्वारे संपर्क साधला.
पुढील कार्यवाही जलगतीने व्हावी, याकरिता दि.15/11/22 रोजी मंत्रालय येथे कक्ष अधिकारी श्री. पाठक व SIAC मुंबई चे संचालक श्री. जैन साहेब यांची भेट घेऊन यावर्षी ( FACULTY) फॅकल्टी चालू करण्या बाबत चर्चा केली.
पुन्हा प्रस्ताव प्रधान सचिव श्री. रस्तोगी यांच्या कडे शासन मान्यता जाणार आहे,
अंबरनाथ च्या UPSC भवन येथून प्रशासकीय अधिकारी होणे करिता अथक प्रयत्न चालु आहेत, यामुळे अंबरनाथ चे नाव देश पातळी वर रोशन होईल,असे वाटते.
ब्यूरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद