भारत जोडो पदयात्रेच्या समर्थनार्थ बाईक रॅली

 भारत जोडो पदयात्रेच्या समर्थनार्थ बाईक रॅली
काँग्रेस पक्षाचे नेते खासदार  राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातील धार्मिक, सामाजिक व राजकीय एकोप्याची भावना टिकून राहण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो पदयात्रा सुरू आहे.
सदर पदयात्रा ०७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्यात प्रवेश करणार असून, या पदयात्रेच्या समर्थनार्थ उल्हासनगर काँग्रेस तर्फे भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
कैलाश कॉलनी येथून या रॅलीची सुरुवात झाली. परम पूज्य चालीया साहेब मंदिर येथून राहुल गांधी यांच्यासाठी आशिर्वाद म्हणून झुलेलाल साई ची टोपी, पवित्र जल व हार  घेऊन रैलीने पुढे मार्गक्रमण केले. 
श्रीराम चौक, उल्हासनगर महानगरपालिका मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहाड मार्गे नेहरू चौक येथील नेहरूंच्या पुतळ्याला हार अर्पण करून तसेच सेंट्रल हॉस्पिटल येथील महर्षी वाल्मिकी स्मारकास पुष्पहार अर्पण करून शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून बाईक रॅली समाप्त करण्यात आली.
या वेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
अशी माहिती आबासाहेब साठे यांनी दिली
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप