‘सृजन द क्रिएशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका महोत्सव

‘सृजन द क्रिएशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका महोत्सव
सृजन द क्रिएशन’ ही संस्था येत्या १५ मे रोजी २ वर्षांची होतेय. लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन कार्यशाळेच्या निमित्ताने जगभरच्या सृजनशील माणसांचे कुटुंब बनले. आज जवळपास १६ ऑनलाईन आणि ५ प्रत्यक्षातल्या कार्यशाळा झाल्या. त्यातून हे कुटुंब विस्तारत आहे. वय वर्ष ७ ते ७० ह्या वयोगटातली लोकं इथं एकत्र येऊन अनेक activities सोबत एकमेकांच्या वैयक्तिक कौटुंबिक सुखदुःखात सामील होत आहेत. अनेक मान्यवरांनी ‘हातचं काही राखून न ठेवता’ त्यांना मार्गदर्शन केलं, करीत आहेत.
येत्या रविवारी १५ मे रोजी सकाळी १०.०० ते रात्री ११.०० असा ९ एकांकिकांचा एक भव्य एकांकिका महोत्सव प्रबोधनकार ठाकरे, लघु नाट्यगृह, बोरिवली येथे सृजनचे कलाकार साजरा करणार आहेत.
या महोत्सवात रमेश पवार, आशिष पाथरे, स्मिता पोतनीस, डॉ. स्मिता दातार आणि राजेश देशपांडे यांच्या विविध स्पर्धांमध्ये पारितोषिकप्राप्त एकांकिका सादर होणार असून रसिकांनी या एकांकिकांचा आनंद घ्यावा असे आवाहन संस्थेचे प्रमुख राजेश देशपांडे ह्यांनी केले आहे
                        प्रतिनिधी गणेश तळेकर 
                       जनहित न्यूज महाराष्ट्र 
                                     मुंबई
__________________________________________बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729
__________________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार