‘आमने सामने’ नाटकाची ‘सेंच्युरी’**उत्सवी प्रयोगांकडून शतक महोत्सवी प्रयोगाकडे

सामने’ नाटकाची ‘सेंच्युरी उत्सवी प्रयोगांकडून शतक महोत्सवी प्रयोगाकडे
खुसखुशीत मनोरंजनाची मेजवानी घेऊन आलेल्या ‘आमने सामने’ या नाटकाने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं हे धमाल विनोदी नाटक रविवार १५ मे ला दुपारी ४.३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे येथे आपला शतक महोत्सवी आनंद सोहळा साजरा करणार आहे. विनोदी अंगानेसुद्धा अनेक महत्त्वाचे विषय मांडता येतात हे दाखवून देणाऱ्या ‘आमने सामने’ या नाटकातून लग्नसंस्थेवर मार्मिकरित्या भाष्य करण्यात आले आहे. येत्या रविवारी १५ मे ला गडकरी रंगायन मध्ये साजऱ्या होणाऱ्या शतक महोत्सवी प्रयोगाला लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेता कवी जितेंद्र जोशी, आरजे दिलीप, दिग्दर्शक रवी  जाधव, लेखक दिग्दर्शक पुरूषोत्तम बेर्डे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
झी नाटय गौरव, आणि मटा सन्मान सोहळयात सर्वोत्कृष्ट नाटकासहित सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री अशा सर्व पुरस्कारांवर या नाटकाने आपले नाव कोरले आहे. आगामी सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कारांमध्ये सुद्धा सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, सहाय्यक अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता, नेपथ्य आणि प्रकाशयोजना अशी ८ नामांकने या नाटकाने पटकावली आहेत.
विशेष म्हणजे नाटकाची आगामी आंतरराष्ट्रीय संमेलनात ही निवड झाली असून यानिमित्ताने ‘आमने सामने’ नाटकाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतील न्यू जर्सी अटलांटिक सिटी येथे होणाऱ्या बृहन महाराष्ट्र मंडळाच्या संमेलनात (BMM 2022 covention ) तसेच ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे २२, २३, २४ सप्टेंबर २०२२ रोज़ी होणाऱ्या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनातही (AAMS  2022) ‘आमने सामने’ नाटकाची निवड झाली आहे.
आमने सामने’ या नाटकाच्या शतकी महोत्सवी वाटचालीबद्दल आनंद व्यक्त करताना अभिनेते मंगेश कदम यांनी आंतरराष्ट्रीय संमेलनात नाटकाची झालेली निवड आमचा हुरूप वाढवणारी असल्याचे सांगितले. नाटकाला मिळत असलेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद पाहता हे नाटक ५०० प्रयोगांचा सुद्धा टप्पा गाठेल असा विश्वास व्यक्त केला.
मंगेश कदम, लीना भागवत, मधुरा देशपांडे, रोहन गुजर यांच्या अभिनयाने रंगलेल्या ‘आमने सामने’ या दोन अंकी नाटकात मागच्या पिढीने काळानुसार नव्याचा स्वीकार करायला हवा हा विचार रंजकरीत्या मांडला आहे. दिग्दर्शक नीरज शिरवईकर यांनी लग्नासारखा महत्त्वाचा विषय हाताळत प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त केले आहे. सादरकर्ते अवनीश व अथर्व प्रकाशित या नाटकाची निर्मिती ‘नाटकमंडळी’ यांनी केली आहे.
करोनाच्या दोन लाटांशी लढा दिल्यानंतर तणावाच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी ‘आमने सामने’ नाटकाची 'हास्याच्या लशीची मात्रा' प्रत्येकाने नाटयगृहात जाऊन अवश्य अनुभवायला हवी.
                   प्रतिनिधी गणेश तळेकर
                 जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार