*फनरल चित्रपटाच्या प्रचाराचा पवित्रस्थळी शुभमुहूर्त

*फनरल चित्रपटाच्या प्रचाराचा पवित्रस्थळी शुभमुहूर्त*
‘माणूस जेव्हा जन्माला येतो, तेव्हा तो रडत येतो आणि सारं जग आनंदी होतं. पण जेव्हा तो जातो, तेव्हा तो शांत होतो आणि सारं जग रडतं. हीच जगरहाटी आहे. थोडक्यात काय तर... ‘जगू आनंदे आणि निघू आनंदे! हा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘फनरल’ हा मराठी चित्रपट येत्या १० जूनला प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालाय. सर्वोत्कृष्ट सिनेमापासून ते सर्वोत्कृष्ट संगीतापर्यंत प्रत्येक सन्मानावर, विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर या चित्रपटाने आपला झेंडा अभिमानाने फडकवून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. योग्य कलाकारांच्या निवडीसाठी या चित्रपटाने प्रत्येक ठिकाणी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. निर्माते व लेखक रमेश दिघे व दिग्दर्शक विवेक दुबे या जोडीने सिनेसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना एक छान सामाजिक कथा ‘फनरल’ चित्रपटाच्या स्वरूपात मांडली व त्याच चित्रपटाचं आज कौतुक होताना दिसतंय.

आरोह वेलणकर, संभाजी भगत, प्रेमा साखरदांडे, विजय केंकरे यांसारखे दर्जेदार कलाकार या चित्रपटात आहेत. काही ठिकाणी हसवत आणि काही ठिकाणी भावनिक करत हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो अशा प्रतिक्रिया फेस्टिवलमध्ये हा चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी दिल्या आहेत. ‘जगू आनंदे निघू आनंदे’ या संकल्पनेवर आधारित असल्याने ‘फनरल’च्या टीमने पवित्रस्थळी म्हणजे चक्क स्मशानभूमीत या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले.

‘मृत्यु हा अशुभ नसून अमूल्य आहे’, त्यामुळे प्रत्येक जाणाऱ्या व्यक्तीला त्याचा शेवटचा सन्मान ही यथायोग्य पद्धतीने मिळायला हवा या विचाराने काम करणारे ताडदेव पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल श्री.ज्ञानदेव वारे यांच्या हस्ते ‘फनरल’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने श्री. वारेंनी आजपर्यंत चाळीस हजारांहून अधिक बेवारस मृतांचे अंतिम संस्कार केले आहेत. या सोहळ्यानंतर आता फनरल सिनेमाच्या टीमने चित्रपटाची जोरदार प्रसिद्धी सुरू केली आहे. एकंदरीत पाहता हा चित्रपट केवळ प्रेक्षकांना सिनेमागृहापर्यंत खेचून आणणार नाही तर त्यांच्या मनात कायमच घर करेल यात शंका नाही.

आयुष्याकडे बघण्याचा अगदी वेगळा विचार घेऊन ‘बीफोर आफ्टर एंटरटेंन्मेंट’ प्रस्तुत फनरल चित्रपट १० जूनला चित्रपटगृहांत येत आहे.
प्रतिनिधी गणेश तळेकर
जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई
__________________________________________
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी आल्हाट  9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार