भारलेलं गीत 'जोगी रे जोगी.

 भारलेलं गीत 'जोगी रे जोगी..
आजच्या व्हिडीओ अल्बमच्या जमान्यात वेगवेगळ्या धाटणीची गाणी रसिकांना मोहिनी घालत आहेत. व्हिडीओ अल्बमच्या जगात लव्ह साँगचा बोलबाला असताना भक्तीरसानं भारलेली काही गाणी रसिकांचं लक्ष वेधून घेत आहेत. 'जोगी रे जोगी...' हे नुकतंच रिलीज झालेलं मराठी गाणं भक्तीरसाची एक वेगळीच अनुभूती देणारं आहे. बनारसमधील गंगा नदीच्या घाटावर चित्रीत झालेलं 'जोगी रे जोगी...' हे गाणं आजच्या काळातील संगीतानं सजवण्यात आलं आहे. हे गीत ऑडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
टाईम ऑडीओची प्रस्तुती असलेल्या 'जोगी रे जोगी...' या गाण्याची निर्मिती प्रवीण शाह, सगुन वाघ, विरल शाह आणि जीत वाघ यांनी केली आहे. शंकर मास्टर यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं असून, कोरिओग्राफीही त्यांनीच केली आहे. गीतकार मुराद तांबोळी यांच्या लेखणीतून अवतरलेलं हे गाणं गायक अतुल काळे यांनी गायलं आहे. अतुल काळे यांच्यावरच हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. संगीतकार कुमारजीत सरकार यांनी या गाण्याला स्वरसाज चढवला आहे. डिओपी संतोष देकाते यांनी या गाण्याची सिनेमॅटोग्राफी केली असून, विनोद पाठक यांनी संकलन केलं आहे. युट्यूबच्या माध्यमातून हे गाणं जगभरातील संगीतप्रेमींच्या सेवेत रुजू झालं आहे. चार साधूंच्या माध्यमातून या गाण्याचा भावार्थ संगीतप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाद्वारे करण्यात आला आहे. या गाण्यात जीवनाचं सार तर मांडण्यात आलं आहेच, पण आजच्या काळात कोणत्या गोष्टी करायला हव्या आणि कोणत्या नाहीत याचे संकेतही देण्यात आले आहेत. त्यामुळं मनोरंजनातून प्रबोधन करणारं भक्तीगीत 'जोगी रे जोगी...'च्या माध्यमातून रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
                     प्रतिनिधी गणेश तळेकर
                   जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार